स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : अक्षय कुमारचा चित्रपट स्पेशल 26 काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून तरूणांना खोटी नोकरी देणारी टोळी या सिनेमात दाखवण्यात आली होती. अशाचप्रकारे हुबेहूब फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नवी मुंबईत अटक कऱण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्राईम इंटेलिजन्स फोर्स आणि इंटेलिजन्स इन्वेस्टीगेशन एजन्सी या दोन्ही एजन्सी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं भासवून बेरोजगार तरूणांना फसवण्यात येत होतं. नोकरी मिळवून देण्याचं आमीष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणाऱ्या दुक्कलीला पोलिसांनी अटक केलीय.


५० हून अधिक तरूणांना फसवून त्यांची लाखो रूपयांना फसवणूक केल्याचं आढळून आलंय. एवढंच नाही तर या टोळीने पनवेल, पुणे, ठाणे या भागात अनेक व्यावसायिकांनाही नोटीसा पाठवून कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं.


पोलिसांनी सापळा रचू महेश भडके, उमेश मोहिते यांना अटक केलीय. हे दोघे इंटेलिजन्स अधिका-यांसारखा पोशाख करायचे, खासगी इंडिका गाडीवर पिवळा दिवा लावायचे, सायरन, केंद्र सरकारचा बोर्ड लावायचे, कारच्या बोनेटवर सीआयएफचं मोठं सिम्बॉलही लावलं होतं.


गेल्या आठवड्यात किरकोळ कारणावरून त्यांनी सीआयएफ आणि केंद्र सरकारचे पोलीस असल्याचं सांगून हरिओम चौरसिया यांना आपल्या कार्यालयात जबरदस्ती डांबूनही ठेवलं होतं. चौरसियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली. या दोघांसोबत आणखी कोणी आहेत का याचा शोध आता सुरू आहे.