Navneet Rana Dance Video: फक्त खासदार नाही तर आता 'Garba Queen' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. राज्यात मोठ्या धुमधडाक्यात नवरात्र (Navratri 2022) साजरा करण्यात येतो आहे. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा अनेक गरबा (Garba) आणि दांडिया (Dandiya) आयोजनात खास करुन हजेरी लावतात. या ठिकाणी गरबा खेळतानाचा नवनीत राणांचे अनेक व्हिडीओ आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या डान्समुळे नवनीत राणा सोशल मीडियावर ट्रोल झाल्यात आहेत. कारण राणा दाम्पत्य यांनी चक्क अल्लाह के बंदे या गाण्यावर ते थरकले आहेत. कायम हिंदुत्व यावर भाष्य करणारे आणि हनुमान चालिसावरुन जेल दौरा केल्यानंतर त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. (Navneet Rana Dance troll nmp)



हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) बंद… अल्लाह के बंदे (Allah Ke Bande) गाणं सुरू असं म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे. नवनीत राणा या कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. कधी बुढ्ढी के बाल बनवणे असो किंवा मोदक करतानाचा व्हिडीओ असो त्या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता त्यांचा अल्लाह के बंदे या गाण्यावर ट्रोल झाल्यावर नवनीत राणा पुढे काय करणार हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.