आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: जाहीर सभेसाठी चंद्रपुरात पोहोचलेल्या एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी  खासदार नवनीत राणा, आमदार नितेश राणे तसेच शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक अमरावतीतून लढवू असे संकेत दिले. यासाठी त्यांनी नवनीत राणा यांना आव्हान केले. काय म्हणाले इम्तियाज जलील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्तियाज जलील आणि खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद नवा नाही.  यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.  हनुमान चालीसा वाचायची असल्यास आपल्या घरात वाचावी चार भिंतीच्या बाहेर उद्धव ठाकरेंच्या घरासमोर का? असा सवालही जलील यांनी विचारला होता..तर सुरुवात नवनीत राणा यांनी केली असून अंत आम्ही करू असं ही जलील म्हणाले होते. यानंतर इम्तियाज जलील नवनीत यांच्या टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नवनीत राणा यांनी मला बोगस जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास मी अमरावतीतून निवडणूक लढतो असे आव्हान त्यांनी दिले. 


'सुरुवात नवनीत राणा यांनी केलीय आम्ही...' इम्तियाज जलील यांच्याकडून अपमानास्पद शब्दांचा प्रयोग


नितेश राणेंना प्रत्युत्तर


वॅक्स बोर्डच्या संदर्भात बोलतांना त्यांनी हे बोर्ड लवकरच बंद होणार असल्याच म्हंटलंय. आपल्या जाहीर भाषणातून नितेश राणे यांनी टिपू सुलतान, एमआयएम अध्यक्ष असोद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावरही निशाणा साधला. याला उत्तर देताना एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या पायजम्याएवढी त्याची उंची असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. देशातील कायदा त्यांच्यासाठी नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आमची सहन करण्याची क्षमता असून ती ओलांडू नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.


जलील यांचा विजय अपघात होता असे विधान शरद पवार यांनी केले होते. यावरही जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असे अपघात राज्यात अनेक ठिकाणी होतील असा इशारा त्यांनी दिलाय.  2024 नंतर भाजपच्या निशाण्यावर दलित येतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


मोदींची स्वच्छ प्रतिमा ती हीच का?


तसेच यावेळी जलील यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली. मोदींच्या आवाजाची नक्कल करताना अजित पवार यांचा सिंचन घोटाळा पाठीशी घालत त्यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याची टीका जलील यांनी केली. मोदींची स्वच्छ प्रतिमा ती हीच का? असा प्रश्न त्यांनी विचारला.