अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: कंगना राणौत हिच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका केल्याची घटना ताजी असतानाच आता माजी सैनिकाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणी वर बोलताना नवनीत राणा या संतप्त झाल्या आहेत. शिवसैनिकांच्या गुंडगिरीचे संजय राऊतांनी समर्थन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेदेखील या सगळ्याला समर्थन आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्याची सत्ता हातातून गेल्यामुळे भाजपचा तमाशा; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'


मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केली होती. मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि सात ते आठ कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतले होते. मात्र, त्यांना लगेच सोडून देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 


तो हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया- संजय राऊत
माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर संयमाचा बांध फुटतो.  हे कायद्याचे राज्य, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.  हल्लेखोरांवर कारवाई केलीय. राजकीय भांडवल करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.