मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांची चौकशी राजकीय आकसापोटी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टायमिंग साधून ही चौकशी होत आहे. सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे काम सुरू आहे. विरोधात बोलणी-यांवर दबाव, भीती निर्माण करण्याचे राजकारण देशात सुरू असल्याचेही मलिक म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येडियुरप्पा, मुकुल रॉय यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असताना त्यांच्यावर धाडी पडत नाहीत तर पी. चिदंबरम यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई होते.  अमित शहांना वाटले असेल ते गृहमंत्री असताना मी जेलमध्ये गेलो आता मी गृहमंत्री असताना ते जेलमध्ये गेले पाहिजेत. पण जनता हे राजकारण पाहत आहे, निवडणुकीत याचे उत्तर देईल असेही मलिक यांनी स्पष्ट केले. 


यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करणाऱ्यांना देखील सुनावले आहे. जे लोक पक्ष सोडून जातात त्यांच्या मनात पराभवाची भीती असू शकते किंवा काही दबाव अथवा लोभ असेल आमदार होऊ शकतो तसेच काहीजण सत्तेबरोबर राहण्यासाठी पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले. काही नेत्यांनी काँग्रेस अथवा राष्ट्रवादी सोडल्याने हे पक्ष दुबळे झाले आहेत असा प्रचार सत्ताधारी करत आहेत. हा हा गुजरात पॅटर्न आहे. गुजरातमध्ये आता भाजपाचे जे 99 आमदार आहेत त्यातील 65 आमदार हे काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले आहेत. 
मोदींनी गुजरातमध्येही हे फोडाफोडीचे राजकारण केले आहे. 


त्यामुळे नेते गेले तर मतं कमी होतील हा गैरसमज आहे. मतदार दुसरीकडे जात नाही. दुसर्‍या पक्षातील लोकांना घेतायत. कारण आपल्या पक्षातील लोक
भिऊन दुसऱ्या पक्षात जात असतील तर भित्र्या लोकांना लोक साथ देत नाहीत.
काही लोभासाठी जात असतील तर लोभी लोकांनाही लोक स्वीकारत नसल्याचे मलिक म्हणाले. 


महत्त्वाचे मुद्दे 


- दरवर्षी पाऊस पडल्यानंतर मुंबईतील खड्ड्यांबाबत मुंबईकर तक्रार करतात
- माहिती अधिकारात महापालिकेने मुंबईत 414 खड्डे असल्याचे सांगितले. त्यात ए विभागात केवळ 5 खड्डे असा दावा महापालिकेने केला 
- एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार रुपये खर्च करतात अशी माहितीही महापालिकेने दिली 
- नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे खड्डे पडतात
- आजही मुंबईतील अर्ध्या रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण झालेले नाही
- महापालिका रस्ते आणि फुटपाथवर नवनवे प्रयोग करत असते
- यांनी कितीही प्रयोग केले तरी मुंबईतील रस्ते दुरुस्त नसतात
- माय मुंबई हे महापालिकेचे ट्विटर हॅण्डल आहे, त्यावर खड्ड्यांची तक्रार केली तर 24 तासात कार्यवाही केली जाईल असा दावा महापालिका आयुक्तांनी केला होता 
- आम्ही आजपासून मुंबई बन गई खड्डे का अड्डा अशी मोहीम ट्विटरवर अभियान चालवणार आहोत, यात मुंबई महापालिकेला टॅग करणार
- आम्ही मुंबईतील खड्ड्यांचे फोटो आणि माहिती महापालिकेला या मोहीमेतून दाखवून देणार आहोत
- आमचे कार्यकर्ते यात सामिल होतील, पण मुंबईकरांनीही यात सहभागी व्हावे असे आमचे आवाहन असेल
- ही मोहीम झाल्यानंतर वॉर्ड निहाय मोर्चा आमचा पक्ष काढणार आहे.
-10 दिवस मुख्यमंत्री मंत्रालय सोडून प्रचारात व्यस्त राहिले तर प्रशासनाचे दुर्लक्ष होते
- पूर परिस्थिती असताना त्यांना उभं करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावायचे सोडून मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहे
- प्रचार यात्रा काढा पण मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी पार पाडा