गडचिरोली : जांभूळखेडा येथे शक्तिशाली भुसुरुंग स्फोट आणणारा आणि  जहाल नक्षल नेता दिनकर (Naxal leader Dinkar ) पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांनी अटक (Naxal leader Dinkar arrested with wife at Gadchiroli) केली आहे. या अटकेनंतर मोठा कट उजेडात येणार आहे. या दिनकरला पकडण्यासाठी लाखो रुपयांचे पोलिसांनी बक्षीस लावण्यात आले होते. तसेच पत्नीलाही पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मे २०१९ रोजी गडचिरोलीच्या (Gadchiroli) कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे शक्तिशाली भुसुरुंग स्फोट घडवून आणल्याने १५ जवान आणि १ खासगी वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा दिनकर मास्टरमाईंड होता. गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने तपास करत बहुतांश आरोपीना बेड्या ठोकल्या. मात्र दिनकर मोकळा होता. तोही ताब्यात आल्याने या घटनेमागचे सर्व सूत्रधार कायद्याच्या चौकटीत येणार आहेत.



नक्षलवादींची पुन्हा बॅनरबाजी 


नक्षल्यांनी पुन्हा एकदा बॅनरबाजी केलीय. १० मार्च रोजी गावागावात महिला दिन साजरा करण्याचे आवाहन या बॅनर पत्रकात करण्यात आले आहे. एटापल्ली तालुक्यातील उडेरा ते बुर्गी मार्गावर उडेरा पासून ३ किमी अंतरावर असलेल्या एका नाल्यावर हे बॅनर लावण्यात आले. 


बॅनर आणि पत्रक क्रांतीकारी महिला संघटन गडचिरोली, भाकपा माओवादी पेरमिली एरिया कमिटीच्या नावाने टाकण्यात आली आहेत. ३ मार्च रोजी आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावरील ताडगाव जवळ अशाचप्रकारे बॅनर, पत्रक टाकून मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.