गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. आज १ मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना गडचिरोलीत जवळपास ५० वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यातील दादापूर इथे रात्री अकरा ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दादापूर इथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रस्ते बांधकाम जागेवर नक्षलवाद्यांनी २७ हून अधिक वाहनांना आग लावली. याच कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर अशा पन्नासहून अधिक वाहनांसह दादापूर इथल्या डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्षलवाद्यांनी  अचानक झालेल्या या जाळपोळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.