गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सहा वाहनांना आग लावल्याची घटना घडली. डोंगरगाव पोलीस चौकीजवळ असलेल्या कोरची तहसील येथे बुधवारी सकाळी जाळपोळ करण्यात आली. १२ माओवाद्यांच्या समूहाने चार ट्रक्टर, दोन जेसीबींना आगी लावल्या. कुरखेडा-कोच्ची-चिचगद मार्गावर झाडे कापून त्याच्या फांद्या रस्त्यावर पसरवून रस्ता रोखून धरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेमागे उत्तर गडचिरोलीतील माओवाद्याच्या विभागीय समितीचा हात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आग लावलेल्या घटनास्थळावरून माओवाद्यांचे काही बॅनर्स हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. माओवादी २५ ते ३१ जानेवारी 'नक्शल सप्ताह' साजरा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान, नक्षलवाद्यांनी 'नक्शल सप्ताह'च्या पार्श्वभूमीवर विविध बैठका तसेच सभा आयोजित केल्या असल्यातचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी रस्ते, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, सुरक्षारक्षकांवर हल्ला करणे याशिवाय समूहात नवीन सदस्यांची भरती करण्याचे कामही केले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.