पुणे : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं चिपको आंदोलन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथील दहा एकर जागेवर शासकीय निवासासाठी इमारती बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्याच्या या वैभवावर कुऱ्हाड मारण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. याला विरोध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिपको आंदोलन करण्यात आल.


यावेळी आंदोलन कर्त्यांनी झाडाला मिठी मारून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हा प्रकल्प सुरू झाल्यास राष्ट्रवादीतर्फे संपूर्ण शहरभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी चिपको आंदोलन करून आपला विरोध दर्शवला.