अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : देशातील नागरिकांना अच्छे दिनाची स्वप्न दाखविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या काळात सामान्य जनतेला वाईट दिवस सुरू झाले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून भाजीपाल्याचे भाव सुद्धा प्रचंड कडाडले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरगुती सिलेंडर गॅस चे भाव सुद्धा गगनाला भिडले असल्याने आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. तर खाद्य पदार्थ व शालेय साहित्यांवर सुद्धा जीएसटी लावण्यात आल्याने या वस्तूंचे भाव सुद्धा प्रचंड वधारले आहे. 


वाढत्या महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेला गिळंकृत करत असून जीएसटीचा आर्थिक फटका सुद्धा सामान्य जनतेलाच बसला आहे. त्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने राजकमल चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं.


वाढते इंधनाचे दर, GST आणि वाढत्या महागाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे.