Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूका (Loksabha Election 2024) जाहीर होतील असा अंदाज अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.  तसंच राज्यात लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची मोठी घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. बारामती अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Ajit Pawar vs Supriya Sule) सामना रंगणाराय.अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून उमेदवार देणार आहेत. अजित पवार गट बारामती लोकसभा लढणार आहे. कर्जतच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांनी घोषणा केलीय. तर उद्धव ठाकरेंच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांवरही लढण्याबद्दल अजित पवार शिंदेंशी चर्चा करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चार जागा लढवणार
बारामती लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त सातारा, शिरुर आणि रायगड या चार जागांवर अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. इतकंच नाही तर जे मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहेत. पण त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या मतदारसंघातही भजप आणि शिंदे गटाशी चर्चा करुन जागा वाटप करता येईल का याबाबत चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. 


त्या चार जागांवर कोण आहेत खासदार?
अजित पवार यांनी ज्या चार जागांची घोषणा केली आहे. त्या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. यापैकी तीन जागांवर शरद पवार गाटते तर एका जागेवर अजित पवार गटाचा खासदार आहे. शरद पवार गटातल्या खासदारांमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटातले सुनील तटकरे हे रायगड लोकसभेत खासदार आहेत. म्हणजे शरद पवार गटाचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातही अजित पवार उमेदवार देणार आहेत. 


अजित पवार गटाकडून कोणाला संधी?
ज्या चार जगांवर अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल  कोल्हे यांच्याविरोधआत दिलीप वळसेपाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. 


जागा वाटपाबाबत सर्वांशी चर्चा करुन
लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय सर्वांशी चर्चा करुन ठरवू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पाच राज्यांच्या निकालानंतर चर्चा करण्याचं ठरलं आहे. आपली सगळी ताकद एनडीएच्या मागे लावू, नरेंद्र मोदी हे देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या विचारांचं सरकार निवडून आणायचं आहे, असं आवाहान यावेळी अजित पवार यांनी केलं.