अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र? राज्यात नव्या भूकंपाची शक्यता, जयंत पाटील म्हणाले `मनोमिलन...`
NCP Political Crisis: राज्यात उद्यापासून अधिवेशन सुरु होणार असतानाच काही वेगवान घडामोडी घडत आहेत. याचं कारण राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत बंड पुकारणारे अजित पवार इतर नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.
NCP Political Crisi: राज्यात उद्यापासून अधिवेशन सुरु होणार असतानाच काही वेगवान घडामोडी घडत आहेत. याचं कारण राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत बंड पुकारणारे अजित पवार इतर नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवारही वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेत आहेत. यानंतर महाराष्ट्रात आता काही नवा भूकंप येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार बंड पुकारत सत्तेत सहभागी झाल्यापासून शरद पवार त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे. अजित पवारांनी फक्त सरकारला पाठिंबा दिलेला नाही, तर अर्थमंत्रीपद मिळालं आहे. अजित पवार यांच्यासह एकूण 9 जणांनी शपथ घेतली असून, सर्वांनाच खाती मिळाली आहेत. दरम्यान, बंड पुकारल्यापासून अजित पवार आणि शरद पवार गटाकडून एकमेकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
अजित पवारांसह सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचल्याने असल्याने आता राज्यात काही नवा भूकंप येतोय का अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान यावेळी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांसमोर आपली राजकीय भूमिका मांडल्याची माहिती मिळत आहे.
जयंत पाटील महाविकास आघाडीची बैठक सोडून रवाना
महाविकास आघाडी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक अंबादास दानवे यांच्या दालनात सुरू होती. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे, जितेद्र आव्हाड यासह जयंत पाटील या बैठकीत उपस्थित होते. मात्र अजित पवार गटातील नेत वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांना फोन करुन बोलावून घेतलं. यामुळे ते बैठक सोडून निघून गेले. जितेंद्र आव्हाडही या बैठकीत उपस्थित आहेत.
जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेटी सुरु असल्याची काही माहिती मिळाली नसल्याचं म्हटलं. "सुप्रिया सुळे यांना मला फोन करुन शरद पवारांनी वाय बी चव्हाण सेंटरला बोलावलं असल्याचं सांगितलं असल्याने मी जात आहे," असं त्यांनी सांगितलं. दरम्यान मनोमिलन होईल का? असं विचारण्यात आलं असता मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले.
अजित पवार यांना अर्थमंत्री पद देण्यात आल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ते शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) येथे पोहोचले होते. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आज नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी ते अचानक 'सिल्व्हर ओक'ला का गेले होते. याबद्दलचा खुलासा केला होता.