विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : मुक्ताईनगरमधल्या लढतीत रंगत वाढली आहे. एकनाथ खडसेंची कन्या आणि भाजपाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीनं पाठिंबा जाहीर केला आहे. एकनाथ ख़डसे यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्यानं रोहिणी खडसे यांच्या समोर विजयाचं कडवं आव्हान उभं राहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत विरूद्ध भाजपच्या रोहिणी खडसे अशी सरळ लढत यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघात होणार आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात फक्त 10 हजारमताचा फरक होता. 



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसल्याने चंद्रकांत पाटील यांना बळ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे रोहिणी खडसे यांच्यासमोर आणखी कडवं आव्हान उभं राहणार आहे.