मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नुकतीच भेट झाली. सद्याच्या राजकीय स्थितीबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली. लवकरात लवकर सत्ता स्थापन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादीला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असे पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता भाजपाला सोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाल्याचे उघड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमधील राज्यातील नेते शिवसेनेसोबत सकारात्मक झाले होते. त्यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पवारांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिल्याचे सांगितले. पण भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जावे असे राज्यातील नेत्यांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका बदलू शकते.



ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे आणि राष्ट्रवादीने भूमिका बदलली त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजपा सोबत हातमिळवणी करावी किंवा वेगळा संसार मांडावा याशिवाय शिवसेनेसोबत दुसरा पर्याय नाही.