मुंबई :  राज्याच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारच्या अनेक योजना मांडण्यात आल्यात असं कसं? योजना केंद्राची आणि श्रेय घेतंय राज्य सरकार. मुलगा दुसऱ्याचा आणि श्रेय घ्यायचे अशी परिस्थिती राज्यात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर बोलताना केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणताही अर्थसंकल्प मांडताना काही विचार असावा लागतो. त्याप्रमाणे या अर्थसंकल्पात पंचसूत्री मांडण्यात आलीय. पण, यात अजित पवारांनी आपल्याच साथीदार असलेल्या पक्षांची अडचण करून ठेवलीय.


काँग्रेसकडे असलेलं शिक्षण खाते आणि शिवसेनेकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते या विभागात पगारावर जास्त खर्च होतो. त्यामुळे या पक्षांना विकास निधी कमी मिळत आहे. राष्ट्रवादी सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के निधी वापरत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडली. यात मनुष्यबळ विकासमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. पण ते कस करणार याचा उल्लेख दिसत नाही. ट्रीलियन डाॅलर इकोनामी संकल्पना मांडली. त्यावेळेस विरोधकांनी खिल्ली उडवली होती. आता तीच संकल्पना अजित पवार यांनी मांडली


पुरवणी मागणी हा कारभार मनमानी पद्धतीचा आहे. बजेट अणि खर्च याचा ताळमेळ नाही. जो खर्च बजेटमध्ये दाखविण्यात येतो तो खर्च त्या कारणासाठी होतच नाही. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तशी ही परिस्थिती आहे. त्यामुळेच बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या आहेत त्या किती पुर्ण होईल या विषयी शंका आहे असे फडणवीस म्हणाले.