Diwali 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत दिवाळीचा उत्सव साजरा केला. पवारांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती त्यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पाहायला मिळाली. यावेळी शरद पवार यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) यांचीही व्यासपीठावर उपस्थिती पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन पवार कुटुंबीय पारंपरिक पद्धतीनं पाडवा (Diwali Padwa) आणि भाऊबीज (Bhai dooj) साजरा करण्यासाठी निघाली. यावेळी पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी सानथोरांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. फोटो म्हणू नका किंवा आपलेपणानं केलेली विचारपूस म्हणू नका. पवार कुटुंबाचं त्यांच्या कार्यकर्त्यांशी असणारं अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.



दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार यांच्यापासून पार्थ पवार यांच्यापर्यंत सर्वांचीच उपस्थिती या दिवाळीच्या निमित्तानं पाहायला मिळाली. यादरम्यानच रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त केली.


अधिक वाचा : मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा


‘साहेब, दादा आणि ताईंवर असणारं प्रेम आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. साहेबांच्या कष्टांमुळेच लोक घरचे सणवरा सोडून इथे येतात हे सर्व पाहून आम्हालाही प्रेरणा मिळते. हे पाहून आम्हालाही जनसामान्यांसाठी काम करण्याची ताकद मिळते’, या शब्दांत रोहित पवारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.


तर, पक्षाशी संबंध नसला तरीही दादा आणि साहेबांच्या प्रेमापोटी इथे सर्वजण येतात हे पाहून आम्हालाही ताकद मिळते असं म्हणत त्यांनी आलेल्या प्रत्येकाचं बारामतीत मोठ्या मनानं स्वागत केलं.