Gujrat Election: गुजरात निकालावर Sharad Pawar यांची लक्षवेधी प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
Gujarat Election Results 2022: गुजरात निवडणुकीची (Gujarat Election Results) सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar On Gujrat Election: दणदणीत विजयासह गुजरातमध्ये भाजपने विजयाचा (BJP In Gujrat) गुलाल उधळला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जादूपुढे काँग्रेस (Congress) नेस्तनाबूत झाल्याचं पहायला मिळालं आहे. गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) निवडणुकीच्या निकाल हाती आले असून गुजरातमध्ये भाजपने 150 च्या वर जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळतंय तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. अशातच आता गुजरात निवडणुकीची (Gujarat Election Results) सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले Sharad Pawar?
गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद लावण्यात आली. गुजरातमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागला म्हणजे देशात एकाच बाजूने मतप्रवाह जातोय असे नव्हे, असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar On Gujrat Election) यांनी केलं आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
दिल्ली महापालिकेच्या (Delhi municipal corporation) निवडणुकीत आम आदमी पार्टीची (AAP) सत्ता आली. हिमाचल प्रदेशमध्ये (HP) अगोदर भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्यामुळे देशात एकाच बाजूने मतप्रवाह जातोय असं म्हणता येत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सोईचे प्रकल्प राज्यात कसे येतील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम निकालावर दिसून आला, असंही शरद पवारांनी बोलून दाखवलं.
आणखी वाचा - Gujarat Result 2022: कोण होणार गुजरातचे मुख्यमंत्री? भाजपकडून 'या' बड्या नावाची घोषणा!
दरम्यान, राजकारणात हळूहळू बदल होत असतात. गुजरातमध्ये निर्माण झालेली पोकळी भाजपने (BJP) भरून काढली. दिल्लीची पोकळी केजरीवालांनी (Arvind Kejariwal) भरून काढली. लोकांना बदल हवा असतो आणि तो वेळोवेळी दिसून येतो. त्याची नोंद राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.