नवी मुंबई : कोपरखैरणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. खैरणे येथे राहणाऱ्या सुफियाना शेख या रिक्षाचालकाचे अपहण करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 नोंव्हेंबर रोजी खैरणेतील रिक्षा स्टॅण्डवर अपहरण आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सुफियांना हा तिथल्या स्टॅण्डवर रिक्षा घेऊन गेला होता. यावेळी तिथल्या काही तरुणांनी सुफियाना याला स्टॅण्डवर रिक्षा लावण्यास विरोध केला. यानंतर त्याला नगरसेवक मुलांवर पटेल यांच्या कार्यालयात नेले असता त्याठिकाणी मुनावर पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार सुफियानाच्या आई साहिदा शेख यांनी कोपर खैरणे पोलिसांकडे केलेली. परंतु कोपर खैरणे पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलीस आयक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली.


या तक्रारीनंतर नगरसेवक पटेल आणि अन्य आठ जणांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आणण्यात येत असल्याची पोलिसांमध्ये कुजबूज सुरु आहे. याप्रकारानंतर अधिक माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत.