पुणे : शहरातील व्यावसायीक जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकरला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय. मानकर याने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर मानकर आज पोलिसांना शरण आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक मानकर हा राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक असून तसेच पुण्याचा माजी उपमहापौर आहे. मानकर याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने मानकर याची पोलीस कोठडीत रवानगी केली. सरकारी पक्षाने सात दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती.


व्यावसायीक जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी मानकरवर गुन्हा दाखल आहे. २ जूनला जगतापने रेल्वे खाली आत्महत्या केली होती. आपल्या आत्महत्येस दीपक मानकर जबाबदार असल्याची चिठ्ठी जगतापने लिहून ठेवली होती. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मानकर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर १० दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार ते आज पोलिसांना शरण आला. अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला.