Sharad Pawar Nashik : राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत पक्षावर दावा ठोकला आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) यांचे वय झाल्याचे म्हणत त्यांना थांबण्याचा सल्लाच अजित पवार यांनी दिला आहे. मात्र वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले आहेत. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. त्याआधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माझा रस्त्याने येताना लोकांचे चेहरे बघितल्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची अशी इच्छा होती की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत असावं. येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवावी असे कार्यकर्त्यांनी सांगितले. 1986 साली नाशिक जिल्ह्याने आम्हा लोकांना दिल्या होत्या. लागोपाठ दोनदा जनार्दन पाटील हे निवडणून आले होते. मतदार संघातल्या लोकांची संमती घेतल्यानंतर भुजबळ यांना संधी देण्यात आली होती," असे अजित पवार म्हणाले.


"मंत्रिमंडळात 70च्या पुढे वय असलेली अनेक लोकं आहेत. मी व्यक्तिगत कोणाविषयी बोलू इच्छित नाही. पण 1978 साली मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझा मोरारजी देसाई यांच्याशी संबंध यायचा. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांचे वय 84 होते. ते दिवसातले किती तास काम करायचे याविषयी चर्चा न केलेली बरी. तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर चांगली कामं करायला तुम्हाला वय कधी अडथळा आणत नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.


सगळा पक्ष सुप्रियां सुळेंना दिला होता या प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. "तो विषय माझ्या वाचनात आला होता. सुप्रियाया सुळेंच्या सार्वजनिक जिवनातील कामाची सुरुवात भटक्या विमुक्तांच्या चळवळीतून होती. नंतरच्या काळात त्यांनी पक्षीय राजकारणात यावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. राज्यसभेवर गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्या बहुमताने विजयी झाल्या. यामध्ये त्यांना सत्तेचं स्थान मिळालं का याचा विचार करायला पाहिजे. पक्ष सत्तेत आल्यानंतर सुप्रिया सुळे लोकसभेत होते. त्यानंतर पराभव झाल्यानंतरही प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेत घेण्यात आले होते. तिथे घेऊन त्यांना 10 वर्षे मंत्रिपद दिलं. पराभव झालेला असतानाही मंत्रिमंडळात घेतलं. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असेल तर सुप्रिया सुळे या लोकसभेत होत्या तेव्हा त्यांना सत्तेत घेण्यात काही अडचण नव्हती. त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. सुप्रियावर अन्याय केला असे लोक म्हणायचे," असेही शरद पवार म्हणाले.