NCP MLA Jitendra Awhad arrest, ठाणे :  'हर हर महादेव सिनेमा'वरुन घातलेला वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( NCP Leader Jitendra Ahwad) यांना चांगलाच महागात पडला आहे.  ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये घातलेल्या (Viviana Mall) राड्या प्रकरणी  जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना आजची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे. ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण पहायाला मिळत आहेत. वर्तकनगर पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांचा ठिय्या(Maharashtra Political News) सुरु आहे. 


ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात जितेंद्र आव्हाडांचे मेडिकल चेकअप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारच्या सुमारास आव्हाड यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. प्रक्रियेचा भाग म्हणून आव्हाड यांना मेडिकल चेकअपसाठी  ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.


गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ


पोलिस ठाण्यापासून हॉस्पिटलपर्यंत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत. मेडिकल तपासणी नंतर पुन्हा आव्हाड यांना पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे. उद्या(शनिवारी) जितेंद्र आव्हाडांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे आव्हाड यांना जामीन मिळणार की या प्रकरणात पुढे काय होणार हे उद्या कोर्टाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.  


काय आहे नेमकं प्रकरण?


ठाण्यातील (Thane) मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Viviana Mall) सिनेमागृहात 'हर हर महादेव सिनेमा'वरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.