Cow Hug Day: 14 फेब्रुवारीला एकीकडे Valentine Day साजरा करण्याची तयारी सुरु असताना केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने (Animal Welfare Day) Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला गायींना अलिंगन द्या, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने (Central Government) केलं आहे. दरम्यान यानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं कौतुक केलं असून, काहींनी मात्र टीका केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे. 


केंद्र सरकारने काय सूचना केली आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा कऱण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला Cow Hug Day साजरा करा अशी सूचना केंद्राने केली आहे. गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली आहे.


जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट


जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून यामध्ये गाय नकार देत असतानाही तिला मिठी मारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. Cow Hug Day साठी हा सराव सुरु असल्याचं उपहासात्मकपणे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.



दरम्यान गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं, असा खोचक सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गायीला मिठी कशी मारायची याचं प्रात्यक्षिक सरकारने 24 तास आधी टीव्हीवर दाखवावं असं ते म्हणाले आहेत. गाईवर प्रेम करण्यास काही हरकत नाही. पण गायी आणायच्या कुठून? सरकार गायी उपलब्ध करून देणार आहे का? अशी विचारणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.