Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत. (Maharashtra Political) आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचं पाणी वेटरनं वापरल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. यात एक वेटर कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचं दिसत आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.


हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करुन हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी सभागृहात सरकारला जाब विचारण्याचा सपाटा लावला आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकार पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय. त्याचवेळी पळ काढणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत, अशा घोषणाही विधीमंडळ परिसरात दिल्या.


दरम्यान, विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडिओने आज विधानसभेतले वातावरण तापले. या व्हिडिओमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले होते. यावेळी किती नालायकपणा कराल? कुठे हे पाप फेडाल? कशासाठी हा नालायकपणा चाललाय?, असा संतप्त सवाल जित पवार यांनी सभागृहात बोलताना उपस्थित केला.



हे नेमके काय प्रकरण आहे?


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी बुधवारी रात्री ट्वीट केलेल्या या व्हिडिओ क्लिपची जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटलेत. या व्हिडिओमध्ये आमदार निवासातील उपहारगृहात कपबशा स्वच्छतागृहात धुतल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला. हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाटी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था, असं ट्वीट मिटकरी यांनी करत हा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याचबरोबर त्यांनी #आझादीकाअमृतमहोत्सव असंही म्हटले आहे.