मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही काळापासून बऱ्याच अंशी कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी म्हणून घालून देण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहेत. याचाच प्रत्यय पुण्यातील कोविड सेंटरच्या कार्यक्रमातही याचाच प्रत्यय आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रम संपताच अजित पवारांना पत्रकारांनी गाठलं. त्यावेळी अजित पवार यांनी असं काही केलं की याची बरीच चर्चा झाली. पुण्यातील या कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना गाठलं. त्यावेळी पत्रकारांच्या हाती असणाऱ्या वाहिनीच्या बूमवर त्यांनी स्वत: सॅनिटायझर मारलं आणि मग बोलण्यास सुरुवात केली. 


कोरोनाच्या या संकटाच्या वेळी चार लोकांमध्ये मिसळायचं म्हटलं की सांगितल्याप्रमाणं सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे. त्यामुळंच अजित पवार याची खास काळजी घेताना दिसत आहे. 


 


यापूर्वीही याचा प्रत्यय आला. काही कामानिमित्त खासदार आणि खुद्द अजित दादांची बहीण सुप्रिया सुळे या अजित पवारांना भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हाही त्यांनी सुरक्षित अंतर ठेवलं होतं. स्वत:च्या बसण्याच्या जागेवर पवारांनी बॅरिगेटींग करुन घेतलं आहे. या अटीशी कोणतीही तडजोड करताना ते दिसत नाहीत. ही काळजी घेणं उत्तमच. कारण, कोरोना काळात नेत्यांपासून सर्वांनीच अशाच पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा संकट आपल्यापासून फारसं दूर नाही.