Maharashtra NCP MLA Jitendra Awhad Arrested : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली आहे. काल वेळ संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. (Maharashtra Political News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात रात्र काढावी लागली. आता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. आज आव्हाडांना कोर्टात जामीन मिळतो की त्यांची कोठडी वाढते याची उत्सुकता आहे. (NCP MLA Jitendra Awhad arrested for disrupting screening of Marathi film ‘Har Har Mahadev’ on Chhatrapati Shivaji Maharaj)


 ‘हर हर महादेव’(Har Har Mahadev Movie) या मराठी सिनेमाच्या वादावरुन ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये राडा केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना  काल अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. कालची रात्र ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्येच गेली.  आज सकाळी वर्तकनगर पोलीस स्टेशनमधून पोलीस त्यांना घेऊन न्यायालयाकडे रवाना झाले. आव्हाडांच्या कस्टडीची पोलिसांनी मागणी केली आहे.  दरम्यान आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशन आणि न्यायालय परिसरात गर्दी झाली केली आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आव्हाडांना कोर्टात हजर केलं गेलं आहे. काल आव्हाडांची ठाणे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी वर्तकनगर पोलीस स्टेशनला करण्यात आली. आज आव्हाडांना जामीन मिळतो की त्यांची कोठडी वाढते याची उत्सुकता आहे. 


8 नोव्हेंबर रोजी, ठाण्यातील मॉलमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन बळजबरीने थांबवल्याबद्दल आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याबद्दल त्यांच्या आणि पक्षाच्या 100 कार्यकर्त्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. अव्हाड यांच्या मते या चित्रपटाने मराठा इतिहासाचे विकृतीकरण केले असून असे चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. आपल्या पत्नीसह चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.


आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार कलम 146 (दंगल), 321 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 406 (विश्वास भंगाची शिक्षा), 323 (स्वेच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.