मुंबई : एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यांच्या गाडीला अचानक आग लागली. त्यांनी गाडी बाजुला घेतली आणि उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी लॉक झाल्याने ते कारमध्येच अडकले. या कारने पेट घेतल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. दरम्यान, कारला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील नाशिकमधील (Nashik) ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. संजय शिंदे यांच्या कारला आग मुंबई-आग्रा महामार्गावरुन जात असताना लागली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत संजय शिंदे यांना मृत्यू झाला.


संजय शिंदे हे द्राक्ष निर्यातदार व्यापारी


संजय शिंदे (Sanjay Shinde) हे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ ही दुर्घटना घडली. शिंदे किटकनाशके खरेदी करण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना कारला अचानक आग लागली. वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या कारला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.


कारच्या आत सॅनिटायझरची बाटली 


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आगीनंतर संजय शिंदे यांनी कार थांबवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही, कारण कारचे दरवाजे लॉक झाले होते. त्यानंतर वेगाने आग पसरली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. "आम्हाला गाडीच्या आत हँड सॅनिटायझरची (Hand Sanitizer) एक बाटली सापडली. आम्हाला असा संशय आहे की, ही आग सॅनिटायझर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असावी."