नाशिक | राज्यात सध्या पक्षांतराच्या राजकारणाला ऊत आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला दिवसेंदिवस मोठे मोठे झटके बसतायंत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. 'माणसं सोडून जाताना वाईट वाटणारच, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला संघर्ष नवा नसल्याचं,' त्यांनी सांगितलं. 'गेले ४० वर्षे ज्यांच्यासोबत काम केलं, ती माणसं सोडून जाताना वाईट वाटणारचं.' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. नाशिकमध्ये संवाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पण संघर्ष करून राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल आणि सत्ता मिळवेल असं पवारांनी स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अनेक मोठे राष्ट्रवादी सोडून गेले. महाराष्ट्रात सध्या विविध पक्षाच्या नेत्यांच्या यात्रा सुरु आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही आता दौऱ्यावर निघाल्या आहेत. 'संवाद' यात्रेच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ते आणि लोकांशी संवाद साधत आहेत. सुप्रिया सुळे पहिल्या टप्यात ६ जिल्हांचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. 


याआधी विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, सचिन अहिर, पुसदचे मनोहरराव नाईक घराणे आणि आता दिलीप सोपल असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एक एक करून पक्ष सोडत आहेत. त्यातच आता आणखी काही मोठे नेते राष्ट्रवाजी सोडण्याच्या विचारात आहेत.