Maharashtra Politics, नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(NCP MLA Jitendra Awad) राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला(Rahul Gandhi bharat jodo yatra) महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


भारत जोडो यात्रेचा आज 64 वा तर महाराष्ट्रतील चौथा दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या या भारत जोडो यात्रेचा आज 64 वा दिवस आहे. महाराष्ट्रात नांदेडमधून (Nanded) सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज चौथा दिवस आहे.  डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय नेत्यांसह खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. 


भारत जोडो यात्रा गांभिर्याने घेतली जातेय


सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते  भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसह पदयात्रा करत आहेत. या यात्रेवर आरोप, प्रत्यारोप टीका सुरु आहे. याचा अर्थ यात्रेची दखल घेतल्या जात आहे. खिल्ली उडवल्या जातंय म्हणजे यात्रा गांभीर्याने घेतली जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


आदित्य ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहुल हे गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रकृती स्वास्थामुळे ते या यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युवा सेना अध्यक्ष तथा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. 


7 नोव्हेंबर 2022 रोजी राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नादंडे मध्ये दाखल झाली. हातात धगधगती मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल झालेल्या राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी घेतलेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंत्परधान नरेंद्र मोदींवप निशाणा साधला. 


महाराष्ट्रात ही यात्रा तब्बल 344 किमीचा प्रवास करणार आहे.  ही पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी थांबणार आहेत. ही यात्रा 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघात भेट देणार आहे.