Crime News : कोयता, तलवार अशा प्रकारणी हत्यारे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना सोलापुरमध्ये (Solapur) तलवार हवेत (possession of sword) फिरवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते महेश कोठेंचे पुत्र प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे (NCP leader's son). लव्ह -जिहाद (Love Jhihad) मोर्चात प्रथमेश कोठे यांनी तलावार हातात घेवून आपला सहभाग दर्शवला होता (Crime News).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकल हिंदू समाजाच्यावतीने गो-हत्या ,धर्मांतर , लव्ह -जिहाद या विरोधात राज्यात आणि देशात कायदा करण्यात यावा या मागणीसाठी 26 फेब्रुवारी रोजी सोलापुरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम युवा सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती समिती, गोरक्षक संघ आदी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 


हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक , मधला मारुती मार्गे माणिक चौक परिसरात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी हवेत तलवार फिरवली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये प्रथमेश कोठे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शस्त्रबंदी आदेश लागू असताना सुद्धा तलवार बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या तडीपार आरोपीला पिस्तुल तलवारसह अटक


नागपूरमध्येही तडीपार असलेला आरोपी आणि त्याचा साथीदार दरोड्याचा प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली आहे. सुरज ब्राह्मणे असं तडीपार आरोपीचं नाव आहे. तर, अंकित वाल्मिक, आणि अमन लोणारे अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. मोतीबाग परिसरात हे दरोडा घालणार  असल्याची गोपनीय माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. याच आधारे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. यावेळी त्यांचकडून पिस्तुल, जिवंत काडतुस, दोरी, तलवार, मिर्चीपावडर, यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.