Renaming : अहमदनगर पाठोपाठ पुणे शहराच्या नामांतराचा मुद्द पेटणार; राष्ट्रवादीच्या भूमीकेमुळे मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
Pune City Name Change Issue : अहमदनगर पाठोपाठ आता पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडनंतर (Sambhaji Brigade) राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुणे शहराचं नामांतर (Pune City Name Change Issue ) करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या नामांतराचा वाद उफाळून आला आहे. संभाजी ब्रिगेडने पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडनंतर पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.
पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. पुणे शहराच्या नामांतराला ब्राह्मण महासंघान विरोध केला आहे. पुण्याच्या नामांतराची गरज नाही तर जिजाऊंचं भव्य स्मारक उभारा अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार आहे. महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर( Sambhajinagar) तर उस्मानाबादच नाव धाराशीव(Dharashiv) करण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.
पण, स्थानिक नेत्यांकडून या संदर्भात कसलीही मागणी नाही, शिवाय काही नेत्यांकडून अहमदनगरच्या नामांतरालाच विरोध आहे.त्यामुळे अहिल्यादेवी नगर या नामांतरासंदर्भात महानगरपालिका आणि स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय आता जिल्हा विभाजनाकड वळला आहे. नामांतराची मागणी होण्याआधीपासूनच अहमदनगरच्या नामांतराचा वाद सुरु आहे.