सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चित्ते पिंपळ या गावी जाऊन दिलीप सोपल यांनी राजीनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये येऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गावात येऊन दिलीप सोपल यांनी आपला राजीनामा दिला. राजीनामा देऊन थेट संध्याकाळच्या विमानाने मुंबई गाठणार आहेत. त्यानंतर उद्या त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. दिलीप सोपल हे आज दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट चित्ते पिंपळगाव गाठले. त्याठिकाणी हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयात हा राजीनामा सोपवला.


आमदार दिलीप सोपल यांच्यासोबत शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे स्वतः हजर होते. त्याच्या या आमदारकीच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जबर झटका बसला आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस असणारे सोपल हे सायंकाळी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेची वाट धरली. या वाटेत त्यांना नेण्यासाठी थेट मुंबईहुन शिवसेनेचे नेते आले होते.