Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
ठाणे : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politcs) मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना जामीन देण्यात आला आहे. मॉलमध्ये हर हर महादेव (Har Har Mahadev Film) या सिनेमाच्या वादावरुन आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 24 तासांच्या आतच आव्हाडांना जामीन मंजूर झाला आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. (ncp mla jitendra awhad and her followers give bail in har har mahadev fil controversy thane news)
आव्हाडांना शुक्रवारी वर्तक नगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आव्हाडांची शुक्रवारची रात्र कोठडीतच गेली. त्यानंतर नियमांप्रमाणे आव्हाडांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली. मात्र आव्हाडांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन देण्यात आला.
नक्की प्रकरण काय?
हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत आव्हाडांनी हा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हा वाद वाढत गेला होता.