बैलगाडा शर्यतीच्या फोटोला सुप्रिया सुळे यांनी पाहा काय दिली टॅग लाईन
बैलगाडा शर्यतीला हजेरी लावत खासदार सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर केले आहेत
बारामती : बारामती (Baramati) शहरातील पुरंदर इथल्या काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'खासदार केसरी बैलगाडा शर्यत' असं या शर्यतीचं नाव होतं.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना या शर्यतीला आवर्जुन हजेरी लावली. आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी या शर्यतीचा थरारही कैद केला. इतकंच नाही तर यावेळी सुप्रिया सुळे यांना बैलगाडाचा कासरा हाती घेण्याचा मोह आवरला नाही.
बैलगाडा शर्यत हा अस्सल मऱ्हाटी मातीतील साहसी खेळ... ग्रामीण अर्थव्यवस्थेत या खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मध्यंतरी काही वर्षे हा खेळ थांबला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर तो पुन्हा सुरु झाला याचा आनंद आहे.
या शर्यतीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यासोबत त्यांनी वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा! अशी टॅग लाईनही दिली आहे.