औरंगाबाद : मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत प्रशासनाचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे असा अपघात घडला. या अपघाताला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. योग्य प्रकारे नियोजन केलं असतं तर असल्या प्रकारचे अपघात टाळता आले असते, असं सुद्धा त्या म्हणाल्या. या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्य सरकारनं शिवस्मारकाचा इव्हेंट केला आहे. त्यातून एका तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवस्मारकाचा मूळ खर्च ३ हजार ८०० कोटी होता. तो १ हजार ३२६ कोटींनी कमी केला गेला, असे ते म्हणालेत.


अशा प्रकारे छत्रपती स्मारकाच्या आराखड्यात बदल करून सरकारने शिवरायांचा आणि देशातील जनतेचा अपमान केल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. मूळ आराखड्यात बदल करून शिवस्मारकाच्या सुरक्षेबाबत तडजोड केल्याचं ते म्हणाले. छत्रपतींचं नाव घेऊन सरकार राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.