Sharad Pawar On Maharastra Politics:  आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. यादरम्यान निरनिराळ्या सहा ऐतिहासिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.


नेमकं काय म्हणाले शरद पवार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे, मी आण  बाळासाहेब थोरात अशा तिघांनी ठरवलं, तर कदाचित महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा विशेष वेगळं काही सांगायची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. राज्य सरकारशी बोलणं सध्या जरा अडचणीचं आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.


राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्थांचं जतन केलं पाहिजे. त्यांच्याकडील खजिना देखील जतन केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन अशा संस्थांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतूक केलं.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...


मागील मर्यादित काळात ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारकडून दोन गोष्टी करून घेतल्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेला 5 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती, या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. अशातच दोन संस्थांना राज्य सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता, असं शरद पवार यांनी म्हटलंय.


आणखी वाचा - धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?


दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व निर्माण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा नवी खेळी खेळणार की काय? असा सवाल आता विचारला जात असल्याचं पहायला मिळतंय.