पुणे :  पुणे शहरातील जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंचा समावेश असलेल्या 'स्मरण रम्य पुणे' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालं. त्यानंतर 'आठवणीतले पुणे' या विषयावर शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी पवारांनी पुण्यात घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार किस्सेही सांगितल्याने उपस्थितांच चांगलच मनोरंजन झालं.


'म्हणून एसपी कॉलेजला'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांची मुलाखत ही महाराष्ट्रासाठी दरवेळेस खास असते. पवारांचं तरुणपण, त्यावेळी भेटलेली माणसं आणि त्यांच्या सवयी अशा प्रत्येकांची इत्यंभूत माहिती पवारांच्या लक्षात असते. यावेळस त्यांनी आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला.


'कॉलेजच्या काळात फर्ग्युसनला मुली असल्यामुळे तिकडे ओढा अधिक असायचा पण नंतर लक्षात आलं तिथे इंग्लिश बोलणाऱ्या मुली असायच्या. ते काही आम्हाला जमायचं नाही.


मग आम्ही त्यानंतर एसपी कॉलेज कडे मोर्चा वळवला' असा किस्सा त्यांनी मुलाखतीत सांगितला. 


'एसपी महाविद्यालय पवार नामक व्यक्तीने बांधले. याच पवारांनी शहरातील अनेक महत्वपूर्ण वास्तू बांधल्या.


पवारांनी इतक दिलं पण तरी पुणेकरांनी पवारांवर मेहरबानी दाखवली नाही. पुणेकरांना पहीला मुख्यमंत्री 'पवारां'च्यामुळे मिळाल्याची आठवण करुन द्यायला शरद पवार विसरले नाहीत.


...म्हणून नाचा पाटील 


श्रीनिवास पाटील एका तरुणीमुळे नृत्य शिकले आणि ते त्याच तरुणीसोबतच एका नृत्य स्पर्धेत सहभागी झाले, तिथं दोघांना सुवर्णपदक मिळालं. म्हणून त्यांवेळी त्यांना नाचा पाटील म्हणायचे.