मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा (froze) निर्णय दिला आहे. मात्र हा आदेश हंगामी स्वरुपाचा असणार आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (andheri bypoll election) शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाचा वापर करता येणार नाही. अशाचत आता शिवसेनेने (Shivsena) थेट सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दाद मागण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"गुणवत्तेवरुन निर्णय घेतले जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाटत होतं ते घडलं. असे घडेल असं माझं मन सांगत होतं. एखादी शक्तीशाली संघटना ते ठरवेल त्या निवडणूक चिन्हांवर जिंकेल असं सांगता येत नाही. त्यामुळे चिन्ह असो वा नसो निवडणुकीला जायची तयारी ठेवली पाहिजे. नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची हा शिवसेनेसमोरील पर्याय आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो आहे आणि त्याचा काही परिणाम होत नाही," असे शरद पवार यांनी म्हटलं.


यानंतर शिवसेना संपणार असं म्हटलं जात आहे असं पत्रकारांनी विचारल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. "शिवसेना अजिबात संपणार नाही उलटं अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीने उठेल आणि आपली शक्ती वाढवेल," असे शरद पवार म्हणाले.