अहमदनगर : महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी सोबत अभद्र युती करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून वंचित ठेवत भाजपला राष्ट्रवादीने मदत केली. कुठलेही पद न घेता भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून दिला. हा निर्णय स्थानिक पातळीवर झालेला असून नगर शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नाही तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नसून महानगरपालिकेत कुठलेच पद घेणार नसल्याचं देखील जगताप यांनी स्पष्ट केलंय. महानगर पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाबाबत पक्षाला भूमिका समजून सांगणार असल्याचे देखील आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.


अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत सगळ्यांनाच धक्का दिला. महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती असल्यामुळे कोणत्या पक्षांची युती होणार, याची उत्सुकताहोती. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून आले. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सत्तेचे गणित जुळल्याचे स्पष्ट दिसले. मात्र, राष्ट्रवादीने हात वर करत हे स्थानिक पातळवरचे राजकारण असल्याचे सांगत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.


राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे महापौर झालेत. भाजपचे महापौर उमेदवार बाबासाहेब वाकळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिकेत प्रवेश केला. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. बारस्कर यांना एकूण ३७ मते पडली. यामध्ये भाजपचे १४, राष्ट्रवादीची १८, बसपाचे ४ आणि एका अपक्षाचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या बोराटे यांना २३ मते मिळाली.