रायगड :  भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येवू नये म्हणून मोठा निधी उभारण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहील. उभारण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून यापुढे शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.


 निधी उभारण्याची संकल्पना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. परंतु आता शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्याची गरज आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना परदेशी किंवा उच्च  शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठा निधी उभारण्याची आमची संकल्पना आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 


गरजू विद्यार्थ्यांना मदत 


रायगड जिल्हयातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली येथे आयोजीत सोहळयात ते बोलत होते. यासंदर्भात राज्यातील प्रमुख शैक्षणिक संस्थांची बैठक आम्ही घेतली त्यात अनेक संस्थांनी सहमती दर्शवली असून या निधीच्या व्याजातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.