अलिबाग : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. रायगड जिल्‍हयात राष्‍ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्‍का दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर देशमुख म्‍हणाले. दरम्यान, काल नाशिकमधील दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले शिवसेनेत प्रवेश केला. महाले यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. महाले हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. दरम्यानस लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार असलेल्या महालेनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 


तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठीचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र याआडून आगामी विधानसभा निवडणुकीत माढा आणि करमाळा मतदारसंघातून शिंदे बंधू भाजपच्या जवळ असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.