वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर :  नीट घोटाळ्याची (NEET Paper Leak) सीबीआयकडून (CBI) जोरदार चौकशी सुरू आहे. सीबीआयने या घोटाळ्यातील आरोपींची पाळंमूळं खणून काढायला सुरूवात केलीय. मात्र याच दरम्यान सीबीआयसमोर एक पेच निर्माण झालाय. तो पेच म्हणजे आरोपींच्या नावाचा. कारण या घोटाळ्याचा सुत्रधार असलेल्या गंगाधरला (Gangadhar) दोन आठवड्यांपूर्वीच उत्तराखंडमधून अटक करण्यात आलीय. मात्र याच घोटाळ्यात बंगरुळूमधून दुसऱ्या एका गंगाधरला अटक करण्यात आलीय.. त्यामुळे नीट घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार कोण? पहिला गंगाधर की दुसरा गंगाधर असा प्रश्न सीबीआय समोर पडलाय..  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगाधर कॉलिंग गंगाधर 
दिल्लीतल्या गंगाधरच्या शोधात लातूर पोलिसांची पथके रवाना झाली होती. आठ-दहा दिवस उत्तर भारतात शोध घेतल्यानंतरही गंगाधर हाती लागला नाही. अखेर उत्तराखंडमधून सीबीआयने दोन आठवड्यापूर्वीच ताब्यात घेतलं. त्या नंतर ते पथक राज्यात परतलं. पण  एन.गंगाधर अप्पा नावाच्या आणखी एका व्यक्तीला आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आली. तो बंगळरु इथल्या सीबीआय कोठडीत होता. त्यामुळे आता सीबीआय पुढे एक नवीन पेज निर्माण झाला आहे. नेमकं कोणत्या गंगाधरने महाराष्ट्रात हा घोटाळा केला आहे. 


गंगाधरचे भन्नाट कोडवर्ड 
सीबीआयच्या ताब्यात असलेल्या गंगाधरच्या मोबाईलमधून भन्नाट कोडवर्ड समोर आलेत. त्याच्या या कोडवर्डवरून हा गंगाधर 2025 मध्ये होणाऱ्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याची तयारी करत असल्याचा सीबीआयला संशय आहे. गंगाधरकडून 6 सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. शेकडो नंबर्स वेगवेगळ्या कोडवर्डने सेव्ह करण्यात आले.  'संतोष 420', 'पाटील नेक्स्ट इयर' नावानेही नंबर सेव्ह करण्यात आलेत. या कोडवर्डबाबत गंगाधरच माहिती देऊ शकतो. त्यामुळे चौकशी करताना त्याचे लाडही पुरवले जातायत. त्याची सध्या एसी कोठडीमध्येच विचारपूस सुरू आहे.


नीट घोटाळ्यामध्ये सीबीआयने आतापर्यंत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळलेत. मात्र आरोपींनी घोटाळा करताना वापरलेली शक्कल सीबीआयलाही चक्रावून सोडणारी आहे. त्यामुळे अटक झालेले दोन गंगाधर आणि त्याच्या मोबाईलमधील कोडवर्ड हे सीबीआयसमोरचं मोठं आव्हान आहे. गंगाधरच्या मोबाईलमधून तब्बल 6 हजार मेसेजेस सापडले आहेत. यात शेकडो लोकांची नावं वेगवेगळ्या को ने सेव करण्यात आली आहेत. 


सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी गंगाधर याच्या मोबाईमधून कोड वर्डच्या माध्यमातुन सेव्ह करण्यात आलेले 6 हजार पेक्षा अधीक चॅटिंगचा अर्थ लावण्यासाठी गंगाधरची कसून चौकशी केली जात आहे. गंगाधरने त्याच्या मोबाईल मधील अनेक महत्वाचा डाटा डिलीट केलेला सुद्धा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे तो डिलीट केलेला डाटा  सीबीआय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.