सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 2 वर्षांनंतर दिवाळी साजरी करायला मिळत असल्यामुळे अनेकांमध्ये जोश आणि उत्साह दिसला. हाच जल्लोष पुण्यातील शेजाऱ्यांमध्ये पाहायला मिळाला. पुण्यात चक्क फटाके लावण्यावरून २ शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा पुण्यातील लोणीकंद परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.


हे ही वाचा - कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फटाके लावण्यावरून २ शेजाऱ्यांमध्ये वाद झाला आणि यातील एका परिवाराने शेजारी राहत असलेल्या घरात जाऊन तोडफोड आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली .याप्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नितेश प्रसाद (१९) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Neighbors are strong enemiesamong neighbors due to setting off firecrackers Video viral nz)


हे ही वाचा - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?


 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे अनेक वर्षांपासून शेजारी राहात असल्याने एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये फटाके लावण्यासाठी जागेवरून वाद झाले. फटाके आमच्या दारात नको लावू या वरुन दोन्ही बाजूने खडाजंगी झाली. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या साथीदारासह फिर्यादी यांच्या घरात जाऊन पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांचे नुकसान केले, तसेच घरात असणाऱ्या कुटुंबातील काही सदस्यांना विटा, लाकडी दांडक्याने मारहाण देखील केली. 


हे ही वाचा - देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा


 


चिराग तिवारी (१९), सागर जावळे (२०), अमीन शेख (१८) यासह इतर २ जणांना पोलिसांनी अटक केली, असून त्यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम अंतर्गत तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), (३) अनुशंगे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर पोलीस अधिक तपास करत आहेत.