ना मुंबई ना चेन्नई, `ही` टीम ठरेल यंदाची डार्क हॉर्स; गावस्करांची भविष्यवाणी
Sunil Gavaskar Prediction on IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण चमकणार अन् कोणता संघ हार्क हॉर्स टीम बनणार? यावर सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sunil Gavaskar On KKR : आयपीएल सुरू होण्यासाठी आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs RCB) यांच्यात खेळवला जाणार आहे. 22 मार्च रोजी होणारा हा सलामीचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चेन्नईचं चेपॉक हाऊसफुल केलंय. अशातच आता यंदाची आयपीएल कोण जिंकणार? यावर भविष्यवाणी होत आहे. अशातच आता लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांनी आयपीएलच्या डार्क हॉर्स टीमवर (Sunil Gavaskar Prediction on Dark Horse Team) मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
यंदाच्या आयपीएलमध्ये एक अशी टीम आहे, जी आपल्या धाकदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध नाही ना आपल्या फलंदाजीसाठी ओळखली जाते. मात्र, हा संघ कोणत्याही परिस्थितीत सामना पलटवू शकतो. हा संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स... केकेआर यंदाच्या आयपीएलमधील डार्क हॉर्स टीम आहे. केकेआरकडे आंद्रे रसल सारखा खेळाडू आहे, जो कोणत्याही क्रमांकावर, स्पेशली 6 व्या आणि 7 व्या क्रमांकावर खेळायला आता तर मॅच पूर्णपणे फिरवू शकतो. एवढंच नाही तर श्रेयस अय्यरच्या आगमनाने संघाची ताकद आणखी वाढली आहे, असंही सुनिल गावस्कर यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर यांच्यावर संघाची जबाबदारी असेल. तर कोणाला खेळवायचं अन् कोणाला बेंचवर बसवायचं, यावर योग्य निर्णय दोघांनात घ्यावा लागेल. दोघंचं कॉम्बिनेशनल केकेआरला अधिक मजबूत बनवेल. यांच्यात चांगला ताळमेळ बसला तर यंदाच्या आयपीएल ट्रॉफीची केकेआर प्रबळ दावेदार असल्याचं मत देखील सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
मला वाटतं की, ध्रुव जुरैलने अलीकडच्या काळात ज्याप्रकारे बॉलिंग केली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याला नक्कीच प्रमोशन मिळू शकेल. आकाश दीपला फारशी संधी मिळाली नाहीत. मात्र, या मोसमात त्याला अधिकाधिक संधी मिळणार आहेत. आकाशने कसोटीच्या टप्प्यात आपली क्षमता दाखवली आहे, त्यामुळे यावेळी त्याला आणखी संधी मिळेल, अशी आशा देखील गावस्करांनी व्यक्त केली आहे.
कसा आहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
श्रेयस अय्यर (C), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज़, सुनील नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मुजीब उल रहमान, शेरफेन रदरफोर्ड, गुस एटिंकसन, मनीष पांडे, केएस भरत, चेतन सकारिया, अंगकृश रघुवंशी, रमनदीप सिंह, शाकिब हुसैन.