नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आता भारतात देखील नव्या कोरोना व्हायरसने एन्ट्री केली आहे.  जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील ८ जणांना नव्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.


ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभाग आणि मनपा आयुक्तांशी चर्चा केलीय. तसंच अधिक खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.