ठाणे : जिल्ह्यातील नेवाळी गावात जमीन हस्तांतरणावरून जो वाद पेटलाय या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालाय. नेवाळीची जमीन नेमकी कुणाची यावरून आता गुंता वाढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेवाळी आणि आसपासच्या गावातील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा गावकरी करताहेत. ती जमीन मुळात त्यांची नसून ती गोविंद गणेश जोगळेकर यांची असल्याचा दावा ठाण्याचे माजी नगराध्यक्ष आनंद चिंतामणी परांजपे यांनी केलाय. 


शिवाजी महाराजांच्या काळात ही जमीन गोविंद गणेश जोगळेकरांना इनामी देण्यात आली होती. ती जमीन १९४२ साली दुसऱ्या महायुद्धासाठी इंग्रजांनी बळकावळी आणि ती जमीन १९४५ साली ब्रिटीश सरकारने स्वतंत्र भारत सरकारकडे हस्तांतरीत केली होती. तेव्हापासून ती जमीन सरकारच्या नावावर आहे. 


त्यामुळे ती जमीन आपली असल्याचा दावा गावकरी करूच शकत नाही, असा खुलासा आनंद परांजपे यांनी केलाय. त्यामुळे आता नवा वाद वाढण्याची शक्यता आहे.