अमर काणे / नागपूर : Nagpur Metro Gaddigodam Bridge : नागपूर मेट्रोची चार स्तरीय वाहतूक व्यवस्था असलेल्या गड्डीगोदम येथील डबल डेकर उड्डाणपुलाच्या ठिकाणी आज नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 800 टन वजनाचे स्ट्रकचर  तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावरील वाहतुकीसाठी नागपूर-दिल्ली मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर लॉन्च  करण्यात आले. (A new record was set today at the double decker flyover at Gaddigodam, a four-tier transport system of Nagpur Metro.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत आहे. शुक्रवारी मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 80 मीटर लांब व 800 टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले. महा मेट्रोने निर्माण कार्यादरम्यान अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड स्थापित केले असून या रेकॉर्डची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या वजनाचे स्टील गर्डर महामेट्रोने यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले.
 
गर्डर लॉंचिंग होताच नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 800 टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित होणे हा अनोखा रेकॉर्ड आहे.  देशात पहिल्यांदाच 1650 टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात येत आहे. नागपूर येथे आज स्थापित करण्यात आलेल्या 800टन वजनाच्या स्टील गर्डरला 32000 एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला असून संपूर्ण स्ट्रकचरला 80,000 बोल्टचा वापर केल्या जात आहे.  


 जमिनीपासून सध्यास्थितीत असलेल्या स्टील गर्डरची उंची 32 मीटर एवढी आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच 22 मीटर रुंद स्टील गर्डर स्थापित करण्यात आला. देशात पहिल्यांदा 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था स्थापित केल्या जात आहे.  या लोखंडी स्ट्रकचरची जमिनीपासून उंची 24 मीटर असून स्टील गर्डरची उंची 32 मीटर व लांबी 80 मीटर व रुंदी 18 मीटर एवढे आहे.