नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी आता नवी मुंबईतल्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीये. जर तुम्हाला बाजार समितीच्या आवारात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं सक्तीचं केलं जाणार आहे. बाजार समितीमध्ये 26 एप्रिलपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मार्केट परिसरात बाजार समितीतील घटकांसाठी ऐच्छिक कोविड एंटिजेन चाचणी केली जाते. हा एंटिजेन रिपोर्ट किंवा 15 दिवसांसाठीचा आरटीपीसाआर रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार असल्याची माहिती बाजार  समितीच्या सचिवांनी दिलीये. तसंच बाजारसमिती मधील किरकोळ विक्रीही बंद करण्यात आलीये.



'आम्हाला आधी ऑक्सिजन द्या'


नवी मुंबईतल्या रबाळे एमआयडीसीत तयार होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पहिल्यांदा नवी मुंबई महापालिकेला द्या नंतर इतर महापालिकेला पुरवठा करा अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलीय. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहीलंय. 


नवी मुंबईच्या कंपनीतील ऑक्सीजन इतर महानगरपालिका क्षेत्रातील पुढारी दम देऊन घेऊन जात असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केलाय. पुढाऱ्यांची दादागिरी चालणार नाही असा सज्जड दमही आमदार गणेश नाईकांनी दिलाय.


राज्यातील रुग्णसंख्या 


राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. 


देशातील रुग्णसंख्या 


कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात  1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.