CM Eknath Shinde : दिलीप वळसे-पाटील, अभिमन्यू पवार, किंवा मग मिलिंद नार्वेकर... या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे... हे सर्वचजण आमदार आहेत.. मात्र त्याहीपेक्षा आणखी एक गोष्ट या तिघांमध्येही समान आहे.. कारण हे तिघेही पीए होते... पीए म्हणजे खासगी स्वीय सहाय्यक... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आणखी एक पीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए असलेले बालाजी खतगावकर.. मुखेड विधानसभेत ते आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत.. गेल्या काही दिवसांपासून बालाजी खतगावकरांनी मुखेड विधानसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवलाय.. गाड्यांच्या ताफ्यासह महापरिवर्तन रॅली काढत बालाजी खतगावकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शनसुद्धा केलंय...  बालाजी खतगावकरांच्या रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.. जेसीबीने फुलं उधळून बालाजी खतगावकरांचं भव्य स्वागतही करण्यात आलं.


मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आमदार होणारच असा विश्वास बालाजी खतगावकरांनी बोलून दाखवलाय.बालाजी खतगावकरांनी बोलताना आमदार अभिमन्यू पवारांचा उल्लेख केलाय ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरले होते.. तेव्हा अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सचिव होते.. फडणवीसांनी त्यांना औसा मतदारसंघातून उतरवलं होतं.. त्यासाठी आधी तयारीसुद्धा करुन घेतली होती. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ल्यावरील रहस्यमयी तलाव; संशोधकांनाही उलगडले नाही याचे रहस्य


अभिमन्यू पवार सचिवाचे आमदार झाले तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील हे सुद्धा शरद पवारांचे पीए होते.  तर आता विधानपरिषदेचे आमदार असलेले मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे पीए होते. आता देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक पीए सुमीत वानखेडेसुद्धा आर्वी मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत..


2019 च्या विधानसभा निवडणुकीत एका अभिमन्यूने राजकीय चक्रव्यूह यशस्वीरित्या भेदला.. आता 2024 मध्ये त्याचीच री ओढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सचिव मुखेडमधून  करताना दिसतायत.. मात्र मुखेडमध्ये गेल्या दोन टर्मपासून भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड आहेत... आणि याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पीए बालाजी खतगावकरसुद्धा लढण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना याचीही चर्चा आता सुरु झालीय..