नेवाळीच्या २५ आंदोलनकर्त्यांना अटक
कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी मानपाडा पोलीसांनी २५ जणांना अटक केलीय.
ठाणे : कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी मानपाडा पोलीसांनी २५ जणांना अटक केलीय.
या सर्वांवर जाळपोळ, दंगल माजवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वांना कल्याण न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दखल करण्यात आले आहेत. तर मानपड्यात एक गुन्हा दाखल झालाय.
मानपाडा पोलीस ठाण्यात २५० जणांवर गुन्हा दाखल आहेत. त्यातल्या २५ जणांना अटक करण्यात आली आहे.