सोलापूर : Newborns baby left on the road : पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात अर्भक रस्त्यावर सोडून एका कुटुंबाने पलायन केले. ही घटना नारायण चिंचोली गावाजवळ घडली. एका अल्पवयीन मुलीला वेदना होऊ लागल्याने तिचे कुटुंबीय रिक्षातून डॉक्टरकडे निघाले होते. मात्र, अचानक पोटात दुखू लागले आणि ती मुलगी प्रसूत झाली. जन्माला आलेले नवजात अर्भक भीतीपोटी रस्त्यावर सोडून तेथून त्यांनी पळ काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याबाबत आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केला होता. त्यांच्या संबंधातून अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट राहिल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी किरण ऊर्फ भैय्या शशिकांत दावणे आणि दत्ता परमेश्वर खरे अशी नावे आहेत. तिसऱ्याचा शोध सुरु आहे. जन्माल्या नवाजात अर्भकाचे वडील शोधन्यासाठी त्यांचा डीएनए घेतला गेला आहे.


या घटनेची माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला प्रसूतीच्या वेदना झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रिक्षामधून दवाखान्यात नेत असताना ती प्रसूत झाली. त्यांनी जन्मलेले अर्भक पंढरपूर - सोलापूर नारायण चिंचोली गावाजवळ रस्त्यात ठेवले आणि तिथून त्यांनी पलायन केले.


त्याचवेळी अविनाश नागनाथ वसेकर हे त्यांचे कुंटूबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मायाक्का चिंचणी देवदर्शनाकरिता कारने जात होते. या, दरम्यान ते नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्यासमोर साईराज ढाब्याजवळ आले. त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात अर्भक दिसुन आले. त्यानंतर त्यांनी, त्या बाळास उपचारासाठी डॉ. शितल शाह यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्याठिकाणी 17 दिवस मोफत उपचार करण्यात आले. यांनतर बाळाला नवरंगे बालकाश्रमात ठेवण्यात आले आहे.


पोलिसांनी शोध घेऊन या घटनेतील लोकांचा तपास लावला. यामधील प्रकरणी अल्पवयीन आई, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई-वडील यांच्याविरोधा पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित लोकांना अटक केल्यानंतर त्या लहान बाळाची आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले. मात्र अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याचे पुढे आले. नवजात बाळाचे वडील कोण हे ठरवणे गुंतागुंतीचे झाल्यानंतर डीएनए तपासी करण्याचे ठरले. त्यानुसार दोघांचे डीएनए तपासणी पाठवले आहे. अजून एकाचा शोध सुरू आहे. तो सापडला की त्याचाही डी एनए पाठवला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामुळे या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 


याप्रकरणी अल्पवयीन मुलीशी शारारिक संबंध ठेवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखीन एकाच्या शोधात पोलीस आहेत, अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.